शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषणमुक्ती आपल्याच हातात ! मधुकर बाचूळकर : ‘चला पंचगंगा जपूया’ या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:48 IST

पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा काय माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. प्रदूषणमुक्ती करायची असेल, तर ती समाज आणि नागरिकच करू शकतात; त्यासाठी आपण प्रबोधन केले पाहिजे, असे मत वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी

ठळक मुद्दे‘चला पंचगंगा जपूया’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणूनपंचगंगा ही गटारगंगा बनली आहे

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा काय माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. प्रदूषणमुक्ती करायची असेल, तर ती समाज आणि नागरिकच करू शकतात; त्यासाठी आपण प्रबोधन केले पाहिजे, असे मत वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी कोल्हापुरात सोमवारी व्यक्त केले.

ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रोटरी क्लब आॅफ करवीर व रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘चला पंचगंगा जपूया’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाहू स्मारक भवनात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या. बाचूळकर यांनी शिक्षकांना पंचगंगा प्रदूषणाविषयी जनजागृतीचे आवाहन यावेळी केले.

बाचूळकर म्हणाले, पंचगंगा ही गटारगंगा बनली आहे. मैलामिश्रित सांडपाणी, विविध नाल्यांमधून येणारे दुर्गंधीयुक्त पाणी तसेच प्लास्टिक, थर्माकोल ही प्रदूषणाची कारणे आहेत. याचबरोबर रंकाळा तलावात मिसळणाऱ्या मैलामिश्रित पाण्यामुळे रंकाळासुद्धा प्रदूषित झाला आहे. प्रत्येक शिक्षकाने प्रामुख्याने नदीकाठावरील लोकांमध्ये पंचगंगा प्रदूषणाविषयी जनजागृती करावी.

प्रदूषणामुळे कोणते दुष्परिणाम होतात, याविषयी सूचना करून प्रबोधन करावे; पण पर्यावरणावर काम करणाºया विविध स्वयंसेवी संघटना आणि याप्रश्नी प्रसारमाध्यमांतून झालेल्या लिखाणामुळे गणेश मूर्तिदानचे प्रमाण वाढले आहे, हा आपला विजय आहे.

दुसरीकडे, गणेशोत्सव काळात साउंड सिस्टीमचा वापर करू नका, त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा. फटाक्यांचा वापर कमी करा, फटाक्यांमुळे ध्वनी व जलप्रदूषण होते, ते टाळावे.शौमिका महाडिक म्हणाल्या, पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी समाजातील सर्वच घटकांनी सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी राजकारणविरहित एकत्र येऊन काम केले पाहिजे.

पंचगंगा ही माझी आई आहे, असे समजून काम केले, तर प्रदूषणमुक्ती होण्यास फार वेळ लागणार नाही; त्यामुळे आपल्या आईला वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यायला पाहिजे. यावेळी रोटरी क्लब आॅफ करवीरचे अध्यक्ष मनोज कोळेकर यांनी प्रास्ताविक, तर रोटरी चॅरिटेबलचे सचिव एस. एन. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उपशिक्षण अधिकारी जे. एस. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोटरीचे सचिव संजय पाटील, रोटरी चॅरिटेबल करवीरचे अध्यक्ष दिनकर आदिक उपस्थित होते.हे करा...निर्माल्य नदी / तलावात टाकू नका.गणेशमूर्ती दान करा अथवा घरामध्ये बादलीत मूर्ती विसर्जित करा.कोणीही प्लास्टिक पिशवीतून निर्माल्य आणू नका, कापडी पिशवीतून आणा.प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मूर्तीचा वापर करा. प्लॅस्टर आॅफ पॅरिस जलचरांना मारक.घरगुती, मंडळाच्या गणेशमूर्ती कुंडीत विसर्जित करा.गणेशमूर्ती काहिलीमध्ये विसर्जित करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा.नदीकाठावरील नागरिकांमध्ये प्रदूषणविषयी जनजागृती करा.हे घटक प्रदूषणासाठी कारणीभूत...प्लास्टिक, थर्माकोल आणि सांडपाणी, मैलामिश्रितनिर्माल्यगणेशमूर्तींचे रंग रासायनिक असतात. ते घातक आहेत; त्यामुळे मूर्ती दान करा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण